बाभुळसर बुद्रुक येथे कमला एकादशी निमित्त आरती व फराळ कार्यक्रम उत्साहात

प्रतिनिधी – अल्लाउद्दीन अलवी 

बाभुळसर बुद्रुक (ता. शिरूर, जि. पुणे) येथे कमला एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भक्तीमय वातावरणात आरती व फराळ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या धार्मिक सोहळ्याला ग्रामस्थ व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

शिरूर तालुका वारकरी सेवा संघाचे माजी अध्यक्ष दिलीप (बापू) सर्जेराव नागवडे व त्यांच्या सुविद्य पत्नी छायाताई नागवडे, तसेच प्रगतशील शेतकरी लालासाहेब (भाऊ) सर्जेराव नागवडे व त्यांच्या सुविद्य पत्नी पुष्पाताई नागवडे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची आरती करण्यात आली.

यावेळी मंदिर परिसरात भक्तीभावाचा दरवळ पसरला होता. “विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठला… हरी ओम विठ्ठला…” या नामस्मरणाने परिसर दुमदुमून गेला. महिला भगिनींसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

आरतीनंतर उपस्थित भाविकांना राजगिरा व केळीचा फराळ वाटप करण्यात आला. या प्रसंगी सर्वांनी भक्तिभावाने प्रसादाचा लाभ घेतला.

या धार्मिक कार्यक्रमामुळे बाभुळसर बुद्रुक गावात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून, वारकरी परंपरेची समृद्ध परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *