केंदूरच्या मांगिरबुवा मंदिरात भक्तिगीतांनी रंगला नवरात्रोत्सव
महिला भजनी मंडळांच्या सुरेल सादरीकरणाने मंदिर परिसर भक्तिमय; भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
केंदूर प्रतिनिधी – कीर्ती साकोरे
केंदूर (ता. शिरूर) : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त थिटे मळा येथील मांगिरबुवा मंदिरात भजन, कीर्तन व भक्तिगीतांचा भक्तिमय कार्यक्रम उत्साहात पार पडला. नवचैतन्य ग्रुप महिला भजनी मंडळ व सद्गुरू कृपा महिला भजनी मंडळासह विविध भजनी मंडळांनी सहभाग घेतला.
देवीची गाणी, पारंपरिक भजने व भावगीते यांच्या सुरेल सादरीकरणाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. महिला कलाकारांच्या भक्तिपूर्ण गायनाला उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली.
यावेळी गुरुकृपा भजनी मंडळ, सोपाननगर, सुद्गुरू कृपा भजनी मंडळ, केंदूर तसेच रुक्मिणी महिला भजनी मंडळ, दिघी गाव यांनी सहभाग नोंदविला. सौ. सुयोजना ढवळे यांनी हार्मोनियमची साथ दिली, तर श्री. बापूदादा सुक्रे व श्री. प्रतापराव डेरे यांनी तबला व ढोलकीची साथ केली.
सौ. मनीषा शिटे, हेमा साकोरे, कीर्ती साकोरे, सविता शेंडकर, अर्चना डेरे, कार्तिकी डेरे, मनीषा साकोरे, किशोरी शिंदे व मोनाली गावडे यांनी भक्तिगीते व देवीची गाणी सादर केली.
कार्यक्रमाचे नियोजन श्री. ज्ञानेश्वर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, पदाधिकारी व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्ती, संगीत आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560





