
साखर कामगारांसाठी दिलासादायक निर्णय : १०% वेतनवाढ व १६ महिन्यांचा फरक मंजूर….
साखर कामगारांसाठी दिलासादायक निर्णय : १०% वेतनवाढ व १६ महिन्यांचा फरक मंजूर ✍️ रिपोर्ट – RJNEWS27MARATHI.COM राज्यातील साखर उद्योग व संबंधित जोडधंद्यांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे एक लाख कामगारांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने १० टक्के वेतनवाढ आणि मागील १६ महिन्यांचा थकबाकी फरक देण्याचा ऐतिहासिक निर्णय १४ जुलै रोजी मुंबई येथे घेण्यात आला. ही घोषणा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत करण्यात आली. या निर्णयामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून वेतनवाढीसाठी संघर्ष करणाऱ्या कामगार संघटनांच्या मागण्यांना अखेर यश मिळालं आहे.