राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर ॲड. संग्राम शेवाळे यांची नियुक्तीp

राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर ॲड. संग्राम शेवाळे यांची नियुक्ती

पुणे प्रतिनिधी 
महाराष्ट्र शासनाच्या युवा धोरण समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून ॲड. संग्रामसिंह नाथाभाऊ शेवाळे यांची प्रतिष्ठेची नियुक्ती करण्यात आली आहे. युवकांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर सातत्याने कार्यरत राहून त्यांनी राज्यव्यापी उपक्रमांची उभारणी केली आहे. त्यांचा व्यापक अनुभव व कार्याचा ठसा लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

ॲड. शेवाळे यांनी लंडनमध्ये कायद्याचे उच्च शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर सामाजिक परिवर्तनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विविध क्षेत्रात कार्य सुरू केले. युवक, विद्यार्थी तसेच समाजातील वंचित घटकांना संधी मिळवून देण्यासाठी त्यांनी राबवलेले उपक्रम विशेष दखलपात्र ठरले आहेत.

राज्य युवा धोरण समितीवर सदस्य म्हणून झालेल्या नियुक्तीनंतर त्यांनी मा. पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे तसेच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

या समितीच्या माध्यमातून युवकांसाठी शिक्षण, रोजगार, क्रीडा, सामाजिक नेतृत्व आणि आत्मनिर्भरतेसाठी नवे व प्रभावी मार्ग शोधण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील. महाराष्ट्रातील युवकांच्या स्वप्नांना बळ देणारे, त्यांना संधी उपलब्ध करून देणारे आणि उज्ज्वल भविष्य घडवणारे धोरण तयार करण्यासाठी मी कटिबद्ध आहे,’ असे विचार ॲड. संग्राम शेवाळे यांनी व्यक्त केले.

या नियुक्तीमुळे राज्यातील युवकांच्या अपेक्षा व आकांक्षांना नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *