ओबीसी समाजाचा मराठा समाजाला दिलेल्या कुणबी जीआर विरोधात आंदोलनाचा इशारा

 ओबीसी समाजाचा मराठा समाजाला दिलेल्या कुणबी जीआर विरोधात आंदोलनाचा इशारा

दौंड (१२ सप्टेंबर):
आज दिनांक १२ रोजी दौंड तहसील कचेरी येथे ओबीसी समाजाच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र जमून मराठा समाजाला कुणबी म्हणून दिलेल्या शासन निर्णयाचा (जीआर) तीव्र विरोध दर्शविला. या प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर करत सरकारकडे आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.

बैठकीदरम्यान ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, “हैदराबाद गॅजेट हे निजामशाही गॅजेट असून त्याच्या आधारे महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण दिले जाऊ शकत नाही. त्यामुळे हा शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक आहे.”

निवेदन सादरीकरणावेळी केवळ पदाधिकारी उपस्थित राहून शांततेत आंदोलनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तथापि, शासनाने जर कुणबी समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय कायम ठेवला तर महाराष्ट्रभरात ओबीसी समाजाचे सर्वात मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही संघटनांच्या वतीने देण्यात आला..

या आंदोलनामुळे दौंड तालुक्यातील ओबीसी समाजाची एकजूट अधोरेखित झाली असून पुढील काळात शासनाने घेतलेला निर्णय राज्यातील राजकीय वातावरणावर मोठा परिणाम करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आरजे न्यूज 27 मराठीसाठी दौंड तालुका प्रतिनिधी – विकास साळुंके 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *