शिरूरला अध्यक्षपद मिळणार का? जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुलं

शिरूरला अध्यक्षपद मिळणार का?
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुलं

 

पुणे 

ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षणाचा जीआर जाहीर केला आहे. यानुसार पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यंदा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुलं झाले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरण संपूर्ण ढवळून निघाली आहे

शिरूरच्या वाट्याला संधी येणार का?
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका हा अनेकदा अध्यक्षपदापासून वंचित राहिलेला आहे. त्यामुळे यंदा या पदावर शिरूर तालुक्याचा दावा मजबूत होईल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिरूरमध्ये अजितदादा पवार गटाचे मोठे प्राबल्य असल्याने या तालुक्याकडे विशेष लक्ष लागले आहे

दिग्गजांचे प्रयत्न
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अनेक दिग्गज नेते सज्ज झाले आहेत. उज्जैन यात्रा, विविध धार्मिक-सामाजिक कार्यक्रम, तसेच जनसंपर्क मोहिमा या मार्गाने मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिरूरमधील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, आता तरी तालुक्याला न्याय मिळायला हवा.

*संधी* : अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले असल्याने शिरूरच्या नेत्यांसाठी मार्ग मोकळा झाला आहे. योग्य वेळी एकजूट साधली, तर अध्यक्षपदाची माळ शिरूरच्या गळ्यात पडू शकते.

*अडचणी* : जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील नेत्यांची ताकद, पक्षीय गटबाजी आणि जिल्हास्तरीय राजकीय समीकरणे हे शिरूरसमोरचे मोठे आव्हान ठरू शकते.
अंतिम निर्णयाची प्रतीक्षा
आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते हे काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. शिरूर तालुक्याला यंदा न्याय मिळतो का, की पुन्हा एकदा या तालुक्याला वंचित राहावे लागते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *