मुतखड्याच्या आजारावर उपचार सुरू असताना 83 वर्षीय महिलेचा मृत्यू

मुतखड्याच्या आजारावर उपचार सुरू असताना 83 वर्षीय महिलेचा मृत्यू

Rjnews 27 मराठी – बालाजी कांबळे 

शिरूर : मुतखड्याच्या त्रासामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या 83 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना दौंड येथे घडली. लक्ष्मीबाई मारुती गायकवाड (वय 83, रा. शिंदोडी, ता. शिरूर, जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीबाई गायकवाड यांना काही दिवसांपासून मुतखड्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांचा मुलगा गौतम मारुती गायकवाड (वय 44) यांनी त्यांना उपचारासाठी दौंड येथील पिरॅमीट हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. रुग्णालयात त्यांच्यावर आवश्यक औषधोपचार सुरू होते.

 

मात्र, उपचार सुरू असतानाच गुरुवारी, 16 जुलै 2026 रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून लक्ष्मीबाई गायकवाड यांना मृत घोषित केले.

 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, पुढील आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार डी. एच. गाढवे यांनी दिली असून, घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *