बेकायदेशीर पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर माणगाव पोलिसांची धडक कारवाई; 75 लाखांचा मुद्देमाल जप्त, 32 जण ताब्य

बेकायदेशीर पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर माणगाव पोलिसांची धडक कारवाई; 75 लाखांचा मुद्देमाल जप्त, 32 जण ताब्य

Rjnews 27 मराठी – विश्वास गायकवाड

माणगाव | प्रतिनिधी | 10 सप्टेंबर 2026 : माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत 32 जणांना ताब्यात घेतले असून, तब्बल 75 लाख 61 हजार 755 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

मुंबई-गोवा महामार्गालगत मौजे ढालघर गावाच्या हद्दीत हॉटेल कार्तिकसमोरील एका इमारतीत पैशांवर पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती माणगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पहाटेच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत काही जण पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले.

 

कारवाईदरम्यान पोलिसांनी जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच चारचाकी व दुचाकी वाहने असा एकूण 75 लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात मुख्य आरोपीसह जुगार खेळणारे, जॉकी आणि जागा मालक अशा एकूण 32 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

 

पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक व तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

 

या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास माणगाव पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights