“जयघोषाने दुमदुमले वडगाव निंबाळकर; संत सेना महाराज पुण्यतिथीला भाविकांची उपस्थिती”

वडगाव निंबाळकर येथे श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी भक्तीभाव व उत्साहात साजरी

 

वडगाव निंबाळकर (प्रतिनिधी) : विकास साळुंके Rjnews27 मराठी 

येथील श्री संत सावता महाराज मंदिर परिसरात श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या भक्तीभाव व उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अभिषेक, विधिवत पूजन, महाआरती, भजन, कीर्तन आणि प्रवचनांचा समावेश होता. दिवसभर भक्तिमय वातावरणात हे सर्व कार्यक्रम पार पडले.

 

सकाळी प्रथम संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आरती व महाप्रसाद वितरण करण्यात आले. पुण्यतिथी सोहळ्याला परिसरातील हजारो भाविक, भगिनी, ग्रामस्थ, तसेच विविध सामाजिक व धार्मिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून संत महाराजांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी ‘संत सेना महाराज की जय’च्या जयघोषाने आकाश गुंजून गेले.

 

पुण्यतिथी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समिती, ग्रामस्थ, सेवाभावी कार्यकर्ते व भाविक यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमादरम्यान सोमेश्वर कारखान्याचे संचालक शिवाजी राजे निंबाळकर, सरपंच सुनील ढोले, उपसरपंच संगीता भाभी शहा, माजी सभापती अविनाशबाबा शिंदे, पंचायत समिती सदस्य जितेंद्र पवार, बारामती नाभिक समाजाचे तालुका अध्यक्ष धीरेन पवार, सुनीलअप्पा जाधव, संजय साळवे, राजू शेठ शहा, नानासाहेब मदने, काका राऊत, जीवन बनकर, जाधव सर तसेच संत सेना महाराज ट्रस्टचे पदाधिकारी, नाभिक समाज बांधव, भगिनी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या सर्वांच्या सहकार्यामुळे हा पुण्यतिथी सोहळा अतिशय समृद्ध व भक्तिमय झाला.

 

दिवसभर चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमांमुळे वडगाव निंबाळकर परिसरात अभूतपूर्व भक्तिमय व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले, त्यामुळे भाविकांमध्ये समाधानाची भावना दिसून आली. संत सेना महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजात भक्ती, एकता व सेवाभाव यांचा प्रसार व्हावा, अशी भाविकांची भावना होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights