सुदर्शन दरेकर यांच्यावर युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा सचिवपदाची जबाबदारी

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा सचिवपदी सुदर्शन दरेकर

 

शिरूर : प्रतिनिधी – Rjnews 27 मराठी 

 

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत शिरूर येथील पत्रकार सुदर्शन दरेकर यांची पुणे जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शकील मणियार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

 

शिरूर येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत दरेकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. ग्रामीण भागातील पत्रकारांना संघटित करणे, संघटनेची ध्येय-धोरणे प्रभावीपणे राबविणे आणि पुणे जिल्ह्यात संघटनेचा विस्तार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

 

यावेळी सुदर्शन दरेकर यांनी संघटनेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच संघटन बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

 

दरेकर यांच्या नियुक्तीबद्दल पत्रकार, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *