केडगाव येथे पशुवैद्यकीय चिकित्सालयामार्फत शेतकरी वस्तीवर मार्गदर्शन व किट वाटप शिबीर संपन्न

केडगाव येथे पशुवैद्यकीय चिकित्सालयामार्फत शेतकरी वस्तीवर मार्गदर्शन व किट वाटप शिबीर संपन्न!

प्रतिनिधी – विकास साळुंके 

डॉ. चैत्राली आव्हाड यांच्याकडून पशुपालकांना विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन

केडगाव : पशुपालकांना आधुनिक शासकीय योजनांची माहिती मिळावी आणि जनावरांचे आरोग्य सुधारावे या उद्देशाने, पशुवैद्यकीय चिकित्सालय केडगाव (ता. दौंड) यांच्या वतीने दि. ११ मे २०२६ रोजी थेट शेतकऱ्यांच्या वस्तीवर जाऊन विशेष मार्गदर्शन व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरादरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चैत्राली आव्हाड यांनी उपस्थित पशुपालक आणि शेतकऱ्यांना पशुपालनाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने पशुपालनासाठी अत्यंत कमी व्याजात कर्ज मिळवून देणाऱ्या किसान क्रेडिट कार्ड योजनेची माहिती देऊन डॉ. आव्हाड यांनी शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. दुग्धव्यवसाय आणि पशुपालनाला व्यावसायिक रूप देण्यासाठी शासनाच्या नवीन उद्योजक योजनांची आणि त्यावर मिळणाऱ्या अनुदानाची सविस्तर माहिती त्यांनी दिली. जनावरांमधील वंध्यत्वाची कारणे, त्यावरील आधुनिक उपाययोजना आणि योग्य व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन करून दुग्धोत्पादन कसे वाढवावे, यावर डॉ. आव्हाड यांनी प्रकाश टाकला.
या प्रसंगी चिकित्सालयामार्फत उपस्थित सर्व शेतकऱ्यांना जनावरांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले जंतनाशक आणि मिनरल मिक्सचर (खनिज मिश्रण) किटचे मोफत वाटप करण्यात आले. यामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास आणि दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.
शेतकऱ्यांच्या वस्तीवर येऊन डॉ. चैत्राली आव्हाड यांनी चालता फिरता बोलता दवाखाना देशामध्ये प्रथम अवॉर्ड मिळवले त्यामुळे त्यांच्या टीमने घेतलेल्या या पुढाकाराबद्दल केडगाव कार्यक्षेत्रातील पशुपालकांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.

“शेतकऱ्यांच्या दारात जाऊन त्यांच्या शंकांचे निरसन करणे आणि शासकीय योजना खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवणे हाच या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.” — डॉ. चैत्राली आव्हाड (पशुवैद्यकीय अधिकारी) आर जे न्यूज 27 साठी दौंड तालुका प्रतिनिधी विकास साळुंके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *