पाटस येथे हॉटेलमध्ये लोखंडी पाईपने मारहाण करून युवकाचा खून; आरोपी ताब्यात
प्रतिनिधी – विकास साळुंके
दौंड (पुणे) – दौंड तालुक्यातील पाटस येथे एका हॉटेलमध्ये झालेल्या वादातून युवकाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास पाटस गावातील अमृत गार्डन नावाच्या हॉटेलमध्ये ही घटना घडली. घरगुती कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपी अशरफ अस्लम शेख (वय अंदाजे २४ वर्षे) याने विश्वास बबन उघडे (वय ३१ वर्षे, रा. मांडवा, ता. वाशी, जि. धाराशिव) यांच्यावर लोखंडी पाईपने जबर मारहाण केली. या हल्ल्यात विश्वास उघडे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची फिर्याद सौ. सारिका सचिन गपाट (रा. पाटील वस्ती, केसनंद, वाघोली, ता. हवेली) यांनी यवत पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.
घटनेनंतर यवत पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पाटस परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेची भावना व्यक्त





