नागरगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५व्या जयंतीला अभूतपूर्व उत्साह; ग्रामस्थांचा जल्लोषात सहभाग

 

नागरगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

ग्रामपंचायत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन;

मान्यवरांनी व्यक्त केल्या गौरवपूर्ण भावना

विजय कांबळे | प्रतिनिधी
नागरगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त नागरगाव येथे ग्रामपंचायत नागरगाव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ग्रामस्थ, भीम अनुयायी व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमास मोठा प्रतिसाद लाभला.


कार्यक्रमाची सुरुवात गावच्या प्रथम नागरिक सरपंच जयश्रीताई रणदिवे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत ग्रामसेविका अनिता कदम मॅडम उपस्थित होत्या.
या प्रसंगी ज्येष्ठ नेते तथा श्री सद्गुरु शिक्षक प्रसारक मंडळाचे सचिव पूनमभाऊ शेलार, श्री सद्गुरु शिक्षक प्रसारक मंडळाचे खजिनदार कांतीलाल आबा शेलार, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल शेलार, पंचायत समिती सदस्य विकास शेलार, भारतीय जनता पार्टी शिरूर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष एकनाथ शेलार, माजी सरपंच हरिभाऊ शेलार, विकास सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन शरद अण्णा साठे, माजी उपसरपंच कमलाकर साठे, विकास सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन अशोक काका खुळे, विकास सेवा सहकारी सोसायटीचे मा .व्हाईस चेअरमन आप्पासाहेब रणदिवे, तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब निंबाळकर, चैतन्य कानिफनाथ विकास सोसायटीचे संचालक चांगदेव वाघमोडे, व्हाईस चेअरमन श्रीपती पंडित, माजी चेअरमन कुंडलिक नाना साठे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावरती प्रकाश टाकताना त्यांनी समता, स्वातंत्र्य व बंधुता या मूल्यांवर आधारित देशाला अशी राज्यघटना दिली की, त्यामुळे भारत देश एकसंध राहिला. तसेच स्त्रियांच्या उद्धारासाठी, हिंदू कोड बिल संसदेत मांडले कायदेमंत्री असताना हिंदू कोड बिल पास होण्यासाठी स्वतः आपल्या पदाचा राजीनामा त्यांनी दिला होता तसेच दीन-दलित, अस्पृश्य व वंचित समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी मोठे कार्य केले. पिढ्यानपिढ्या अंधकारात झगडलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन वाहून घेतले.
तसेच महाडचे चवदार तळे सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेतील विचार, एलआयसी विमा कंपन्यांच्या संकल्पनेची पायाभरणी, शेतकऱ्यांसाठी हिराकुड प्रकल्प, दामोदर प्रकल्प, अशा अनेक दूरदृष्टीच्या योजना व कार्यांची माहिती मान्यवरांनी दिली.
“शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा मूलमंत्र त्यांनी त्यावेळी सर्वांना दिला होता. या विचारांचे आचरण सर्व भीम अनुयायांनी केले पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हेच त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार लहूकुमार पाडळे यांनी मानले.
या वेळी नितीन डिखळे, सागर कांबळे, प्रदीप कांबळे, प्रफुल्ल डिखळे, भाऊसाहेब हराळे, सचिन कांबळे, नितीन कांबळे, सिद्धार्थ कांबळे, अविनाश डिखळे, किरण डिखळे, बापू डिखळे, सुनील कांबळे, सार्थक डिखळे, अविष्कार शेलार, दत्तात्रय माने, मयूर डिखळे, बाळासाहेब माने आदी भीम अनुयायी तसेच समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *