पाटस टोल प्लाजा येथे सिस्टीम मॅनेजर समाधान पवार यांना गौरव पूर्ण निरोप सोहळा
पाटस प्रतिनिधी – योगेश राऊत

पाटस (ता. दौंड) : बुधवार, दिनांक २५ मार्च २०२६ रोजी पुणे–सोलापूर एक्सप्रेस वेवरील पाटस टोल प्लाजा येथे सिस्टीम मॅनेजर समाधान पवार यांचा निरोप समारंभ गौरवपूर्ण वातावरणात पार पडला. त्यांच्या कार्यकाळात सर्व कर्मचाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केल्यामुळे हा निरोप सोहळा विशेष ठरला.
समाधान पवार हे नेहमी हसतमुख, मनमिळावू व सहकाऱ्यांच्या अडचणी समजून घेणारे अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांनी कधीही वरिष्ठ पदाचा दुरावा ठेवला नाही, तर सर्व कर्मचाऱ्यांमध्ये मिसळून काम करण्याची शैली जपली. त्यामुळेच पाटस टोल प्लाजा सुरू झाल्यापासून अनेक अधिकारी येऊन गेले असले तरी पवार यांच्याशी निर्माण झालेले आपुलकीचे नाते वेगळेच असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
काही वैयक्तिक कारणास्तव त्यांनी पुणे–सोलापूर एक्सप्रेस वे कंपनीचा निरोप घेत दुसऱ्या कंपनीत नवीन जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी पाटस टोल प्लाजावरील इलेक्ट्रिशन टीमसह सर्व कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
या निरोप समारंभास फनी कुमार मुला, राजेश सिंग, प्रवीण कांबळे, आनंद सरोदे, भगत देवरे, प्रशांत नवले यांच्यासह इतर सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सहकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत पवार यांच्या कार्याची व व्यक्तिमत्त्वाची प्रशंसा केली.




