मांडवगण फराटा येथील उद्योजक तथा शिवशक्ती दूध संकलन केंद्राचे अध्यक्ष संदीप उर्फ पप्पू शेठ फराटे यांना जिल्हास्तरीय ‘आदर्श उद्योजकता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या उद्योगशील कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक संभाजी आप्पा फराटे यांच्या हस्ते पप्पू फराटे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला श्रीरंग शिंदे पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. धनंजय शिंदे पाटील, शिरूर पंचायत समिती सदस्य संगीताताई किशोर फराटे, महाराष्ट्र भूमीचे संपादक आण्णा बारवकर, हभप अंजलीताई ढवळे महाराज, सरपंच निर्मलाताई फलके, सरपंच दिपालीताई नागवडे, चेअरमन वैभवदादा फराटे, Rjnews 27 मराठीचे संपादक रमेश बनसोडे, किशोर फराटे, उपसंपादक अल्लाउद्दीन अलवी, राजेंद्र कांबळे, ऋषी निंबाळकर, बालाजी कांबळे, बाळासाहेब खळदकर, विजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. धनंजय शिंदे पाटील म्हणाले की, “पप्पू फराटे यांचा हा सन्मान त्यांच्या प्रत्यक्ष कामाचा आणि समाजासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्यांनी दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून आपले आयुष्य सुरू केले. मात्र जिद्द, कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी थोडे-थोडे पैसे जमा करून स्वतःचा व्यवसाय उभा केला. आज त्यांच्या उद्योगामुळे अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार मिळत आहे. त्यामुळे हा सन्मान खऱ्या अर्थाने त्यांच्या संघर्षमय प्रवासाची दखल आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसंपादक अल्लाउद्दीन अलवी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र कांबळे यांनी केले तर बालाजी कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
उद्योजक संदीप उर्फ पप्पू फराटे यांनी उभारलेल्या शिवशक्ती दूध संकलन केंद्रामुळे परिसरातील अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर व बाजारपेठ उपलब्ध झाली असून त्यांच्या कार्यामुळे गावाच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




