इंदापूर येथे रविवारी वर्षावास धम्म प्रवचन; दश पारमितांच्या महत्त्वावर सुनिल देवरे सरांचे मार्गदर्शन

इंदापूर येथे रविवारी वर्षावास धम्म प्रवचन; दश पारमितांच्या महत्त्वावर सुनिल देवरे सरांचे मार्गदर्शन

 

माणगाव, दि. २२ ऑगस्ट : प्रतिनिधी – विश्वासराव गायकवाड

 

बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगाव यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षावास धम्म प्रवचन मालिकेअंतर्गत रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी इंदापूर येथील संबोधि विहार येथे भव्य वर्षावास धम्म प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ४, २६ गाव ग्रुप इंदापूर विभाग, संबोधि विहार समिती आणि संबोधि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा धम्मजागर आयोजित करण्यात आला आहे.

 

रविवारी सकाळी १० वाजता संबोधि विहार, इंदापूर येथे कार्यक्रमास प्रारंभ होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्धजन पंचायत समिती माणगाव तालुका उपाध्यक्ष आयु. नामदेवजी राव राहणार आहेत.

 

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता संबोधि विहार समितीचे माजी कार्याध्यक्ष मा. आयु. लक्ष्मणजी गव्हाणे यांच्या हस्ते धम्मध्वजारोहणाने होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता श्रामणेर नंदजी साळवी व श्रामणेर संघ यांच्या उपस्थितीत त्रिसरण, पंचशील व धम्मपूजापाठ होणार आहे.

 

सकाळी ११ वाजता स्वागत व धम्मप्रवचन समारंभ होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ४ चे सचिव आयु. मुकेश सकपाळ करणार असून स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी सहचिटणीस आयु. महेंद्र गायकवाड सांभाळणार आहेत. संबोधि विहार समितीचे कार्याध्यक्ष आयु. सयाजी मोरे हे कार्यक्रमाची प्रस्तावना करतील.

 

या वर्षावास धम्म प्रवचन मालिकेतील प्रमुख आकर्षण म्हणजे प्रबोधनकार मा. आयु. सुनिल देवरे सर यांचे धम्मप्रवचन. ‘बौद्ध धम्मातील १० पारमिता व त्यांचे महत्त्व’ या विषयावर ते उपस्थितांना सखोल मार्गदर्शन करणार आहेत. वर्षावासाच्या पवित्र काळात धम्मविचार, नैतिक मूल्ये आणि पारमितांचे जीवनातील महत्त्व समजून घेण्याची संधी या माध्यमातून उपासक-उपासिकांना मिळणार आहे.

 

कार्यक्रमाच्या शेवटी कोषाध्यक्ष ॲड. राकेश मोरे हे आभार प्रदर्शन करणार आहेत. तसेच दानशूर व्यक्तिमत्त्व आयु. विठ्ठल मो. जाधव यांच्या वतीने उपस्थितांसाठी भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

या कार्यक्रमास बौद्धजन पंचायत समिती तालुका अध्यक्ष आयु. रविंद्र मोरे, उपाध्यक्ष आयु. नामदेव राव, सचिव आयु. रघुनाथ साळवी, तालुका सहसचिव आयु. रंजित मोहिते, कार्याध्यक्ष व खजिनदार आयु. सुरेंद्र जाधव, कायदेशीर सल्लागार ॲड. नरेश जाधव, प्रसिद्धीप्रमुख आयु. गौतम जाधव, प्रसिद्धीप्रमुख आयु. उत्तम तांबे, संस्थापक अध्यक्ष आयु. एम. बी. सकपाळ सर, माजी सभापती आयु. अंकुश सकपाळ, माजी अध्यक्ष आयु. नारायण गायकवाड, आयु. रामदास मोरे, आयु. प्रकाश कासे, आयु. जितेंद्र राव, आयु. मिलिंद राव, आयु. बुद्धघोष पवार यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

 

तसेच संबोधि महिला मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती रंजना राव, प्र. स. श्रीमती माधुरी सकपाळ मॅडम यांच्यासह बौद्धजन पंचायत समिती, संबोधि विहार समिती, संचालक मंडळ आणि महिला मंडळाचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

 

वर्षावास काळातील या धम्मज्ञानयज्ञाचा सर्व उपासक-उपासिकांनी लाभ घ्यावा, यासाठी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमास येताना सर्वांनी शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहावे, असेही आयोजकांनी सांगितले आहे.

 

कार्यक्रमाचे ठिकाण : संबोधि विहार समिती, इंदापूर, ता. माणगाव, जि. रायगड.

 

— विश्वास बळीराम गायकवाड, बोरघर, माणगाव, रायगड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *