खंडाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी भास्कर साहेबराव नरवडे, तर उपाध्यक्षपदी छाया ईश्वर नरवडे यांची बिनविरोध निवड 

खंडाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी भास्कर साहेबराव नरवडे, तर उपाध्यक्षपदी छाया ईश्वर नरवडे यांची बिनविरोध निवड 

प्रतिनिधी – अल्लाउद्दीन अलवी 

 

अल्लाउद्दीन अलवी पुणे जिल्हा प्रतिनिधी ता.२० शिरूर येथील मा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरूर कार्यालयात

दि २०/०८/२०२६ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी धायगुडे सहकारी संस्था श्रेणी दोन यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा घेण्यात आली . याअगोदर संस्थेचे खंडाळे येथील कार्यालयात सभा घेण्यात आली होती,परंतु गणसंख्या अभावी ०६/०८/२०२६ रोजी सभा तहकूब करण्यात आली. तसेच यामुळे निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी धायगुडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभा २०/८/२०२६ रोजी सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये घेण्यात आली . यावेळी शासकीय नियमानुसार अध्यक्षपदासाठी व उपाध्यक्षपदासाठी अर्ज मागविण्यात आले.सदर अध्यक्षपदासाठी श्री भास्कर साहेबराव नरवडे तर उपाध्यक्ष पदासाठी सौ.छाया ईश्वर नरवडे यांचा एकमेव अर्ज आल्याने . सदर अर्जाची छाननी शासकीय नियमानुसार करून निवडणूक निर्णय अधिकारी धायगुडे साहेब यांनी अध्यक्षपदी भास्कर साहेबराव नरवडे यांची ,तर उपाध्यक्षपदी छाया ईश्वर नरवडे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे व संचालिका सुजाता नरवडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थितीत संचालक राजेंद्र नरवडे, गणेश नरवडे, रामचंद्र गव्हाणे , गुलाब नरवडे ,राजेश नरवडे ,संपत नरवडे, सुजाता नरवडे, नवनाथ दरवडे, सुभाष दरवडे ,केशव सरोदे ,सुरेखा नरवडे, छाया ईश्वर नरवडे, अनिल वरपे आदी बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे यांनी सांगितले की खंडाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सभासदांना वेळेवर कर्ज पुरवठा करुन तसेच वेळेत कर्ज वसुली केल्याने संस्था चांगल्या प्रकारे कारभार करीत असल्याचे यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *