*“शेतकरी, सहकार आणि परिवर्तनाचा मुद्दा घेऊन पाचंगे रणांगणात!”

*“शेतकरी, सहकार आणि परिवर्तनाचा मुद्दा घेऊन पाचंगे रणांगणात!”

 

पुणे : प्रतिनिधी 

 

         “सहकार वाचवा – शेतकरी वाचवा”चा निर्धार करत सामाजिक कार्यकर्ते संजय शिवाजी पाचंगे यांनी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक २०२६ मध्ये उतरण्याची घोषणा केली आहे. सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार, शेतकरी प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष आणि तालुक्यातील नेतृत्वाचा अभाव या पार्श्वभूमीवर परिवर्तनासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उदाहरण देत पाचंगे यांनी मागील सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. सहकारी संस्थांचा वापर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी करण्यात आला आणि त्यामुळे सहकार चळवळच मोडीत निघाल्याची टीका त्यांनी केली. “जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न होतो, मात्र प्रत्यक्ष समस्यांवर बोलायला कोणी तयार नाही,” असा आरोपही त्यांनी केला. शेतमाल विक्री, बाजारभाव, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, रोजगार, शिक्षण शुल्क, कायदा-सुव्यवस्था, घोडगंगा कारखाना, शिरूर बसस्थानक यांसारख्या अनेक प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक चळवळीमधून सातत्याने आवाज उठवूनही प्रश्न सुटत नसल्याने आता प्रत्यक्ष सत्तेत जाऊन लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले.

 

तालुक्यात नवीन आणि सक्षम नेतृत्व निर्माण करण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी तरुणांना पुढे येण्याचे आवाहन केले. “राजकारणात सामाजिक भान असलेले, अभ्यासू आणि लढाऊ नेतृत्व निर्माण झाले पाहिजे. आगामी काळात तालुक्याला सक्षम नेतृत्वाची मोठी गरज भासणार आहे,” असेही त्यांनी नमूद केले. या निवडणुकीच्या माध्यमातून परिवर्तनाची नवी राजकीय चळवळ उभी राहील, असा विश्वास व्यक्त करत इच्छुकांनी सहभागी होऊन संपर्क साधावा, असे आवाहन संजय पाचंगे यांनी केले आहे.l

 

ही निवडणूक पैसा कमावण्यासाठी किंवा बडेजावासाठी नाही. चांगली व्यवस्था उभी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही मैदानात उतरत आहोत. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातील आदर्श बाजार समिती बनवण्याचा आमचा प्रयत्न असेल.

– *संजय पाचंगे (उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश भाजपा उद्योग आघाडी.)*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *