उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दोन महत्त्वपूर्ण निवेदने सादर
प्रतिनिधी – विजय कांबळे
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या रोजगार स्वयंरोजगार सेल महाराष्ट्र राज्याच्या वतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दोन महत्त्वपूर्ण मागण्यांसंदर्भातील निवेदने सादर करण्यात आली. राज्य सरचिटणीस संजय खंडारे तसेच पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ही निवेदने देण्यात आली असल्याची माहिती प्रतिनिधी शाम जगताप यांनी दिली.
पहिल्या निवेदनामध्ये आदरणीय श्री दीपकभाऊ मानकर यांना आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. कार्यकर्त्यांमध्ये दीपकभाऊ मानकर यांच्याबद्दल मोठा विश्वास असून त्यांच्या नेतृत्वक्षमतेमुळे ते निवडणुकीत निश्चित विजयी होतील, अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी त्यांना संधी देणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
दुसऱ्या निवेदनात महिलांच्या आरोग्य, फिटनेस आणि सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची मागणी करण्यात आली. राज्यातील जिम, स्विमिंग पूल तसेच विविध कसरत केंद्रांमध्ये महिलांना दर महिन्याला अतिरिक्त पाच दिवस सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महिलांच्या आरोग्याला चालना देणारा तसेच महिलांना अधिक प्रोत्साहन देणारा हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या दोन्ही मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली.




