गिट्स कंपनीतील तांब्याची केबल चोरणारा जेरबंद यवत पोलिसांची सीसीटीव्हीच्या आधारे कारवाई; एक लाखांचा मुद्देमाल जप्त

गिट्स कंपनीतील तांब्याची केबल चोरणारा जेरबंद यवत पोलिसांची सीसीटीव्हीच्या आधारे कारवाई; एक लाखांचा मुद्देमाल जप्त

 

प्रतिनिधी : योगेश राऊत

 

यवत : नांदूर (ता. दौंड) येथील गिट्स कंपनीमधून तांब्याच्या केबलची चोरी करणाऱ्या आरोपीला यवत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जेरबंद केले. आरोपीकडून चोरीच्या तांब्याच्या केबलसह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

सागर बिभिषण जाधव (वय २५, रा. तुपेवस्ती, ता. हवेली; मूळ रा. सहजपूर, ता. दौंड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. २ सप्टेंबर रोजी रात्री नांदूर येथील गिट्स कंपनीतून सुमारे ९४ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या केबलची चोरी झाली होती.

 

घटनास्थळावरील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. चौकशीदरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून ६० हजार रुपये किमतीची तांब्याची केबल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली.

 

पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार रविंद्र मोहिते पुढील तपास करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलिस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिसांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights