विशेष कार्यकारी अधिकारीपदी अतिश गुळवे यांची निवड; आलेगाव पागा परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव

आलेगाव पागा, ता. शिरूर : प्रतिनिधी- Rjnews27 मराठी

 

आलेगाव पागा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते श्री. अतिश अनिल गुळवे यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

अतिश गुळवे हे गेल्या सुमारे दहा वर्षांपासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. ते उमंग सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणूनही सामाजिक उपक्रम राबवत असून, सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत.

 

आलेगाव पागा व परिसरातील अनुसूचित जातीतील महिलांना वन विभागाच्या माध्यमातून गॅस कनेक्शन मिळवून देण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी बँक ऑफ इंडिया, नावरे शाखेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम केले आहे.

 

याशिवाय पीएम किसान योजना, अॅग्रीस्टॅक, पीक विमा योजना यांसह विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकरी व गरजू नागरिकांना मिळवून देण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन आणि पाठपुरावा केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही विविध शासकीय योजना, सुविधा आणि नागरिकांसाठी उपयुक्त माहिती सातत्याने प्रसारित करण्याचे काम ते करत आहेत.

 

उच्चशिक्षित असलेल्या अतिश गुळवे यांनी सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देणे, अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणे तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, यावर विशेष भर दिला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड करण्यात आली आहे.

 

त्यांच्या सामाजिक कार्याची दखल शिरूर तालुक्याचे आमदार श्री. माऊली आबा कटके यांनी घेतल्याचे सांगण्यात आले. तसेच आलेगाव पागाचे कार्यक्षम पोलीस पाटील श्री. विशाल अवचिते यांनी निवडीसाठी सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा केला. आलेगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य व शिरूर केसरी श्री. विशालराव वाकचौरे यांचेही या प्रक्रियेत मोलाचे सहकार्य लाभले.

 

निवडीबद्दल माजी उपसरपंच लालासाहेब वाकचौरे, प्रगतिशील बागायतदार सुभाष नाना भोसले, प्रगतिशील बागायतदार जोगा जांभळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब जांभुळकर तसेच जांभळकर परिवाराच्या वतीने अतिश गुळवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीनेही त्यांचा गौरव करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

सामाजिक बांधिलकी, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने केलेल्या कामाची दखल घेत मिळालेली ही जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याचा विश्वास अतिश गुळवे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *