खैरेनगर येथे अधिक मासानिमित्त गाथा पारायण सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद*

खैरेनगर येथे अधिक मासानिमित्त गाथा पारायण सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद*

प्रतिनिधी – अंकुश khare
शिरूर तालुक्यातील खैरेनगर येथे अधिक मासानिमित्त श्री हनुमान मंदिरात रविवार दिनांक १७ मे २०२६ पासून भव्य गाथा पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला असून परिसरातील भाविकांकडून या धार्मिक उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ह.भ.प. काळुराम महाराज खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा आध्यात्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात सुरू आहे.
अधिक मासाचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या गाथा पारायणामध्ये दररोज पहाटे काकडा आरती, हरिपाठ, गाथा वाचन, प्रवचन, भजन, कीर्तन तसेच सामूहिक नामस्मरणाचे आयोजन करण्यात येत आहे. परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच वारकरी संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघत आहे.
ह.भ.प. काळुराम महाराज खैरे आपल्या प्रवचनातून संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे महत्त्व, वारकरी संप्रदायाची परंपरा, समाजप्रबोधन तसेच अध्यात्मातून जीवनाला योग्य दिशा कशी मिळते याविषयी मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या प्रभावी वाणीमुळे भाविकांमध्ये भक्तीभाव निर्माण होत असून युवकांनीही या धार्मिक परंपरेत सहभागी व्हावे, असा संदेश देण्यात येत आहे.
गाथा पारायणाच्या निमित्ताने मंदिर परिसर आकर्षक सजावटीने सजविण्यात आला असून दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. यामुळे खैरेनगर परिसरात भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून आगामी दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *