महेश्वर मल्टीस्टेटच्या विसापूर शाखेचा उद्घाटन समारंभ रविवारी

मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन अद्ययावत कार्यालयाचे होणार लोकार्पण

अल्लाउद्दीन अलवी | प्रतिनिधी

विसापूर, ता.२२ : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे महेश्वर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, काष्टी या संस्थेच्या नवीन अद्ययावत शाखा कार्यालयाचा भव्य उद्घाटन समारंभ रविवार दिनांक २४ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या उद्घाटन समारंभाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार प्रा. रामजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा माजी आमदार बबनराव पाचपुते साहेब उपस्थित राहणार आहेत.

विसापूर येथील नव्या शाखेच्या माध्यमातून नागरिकांना आधुनिक व विश्वासार्ह आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे संस्थेचे चेअरमन दत्तात्रय गावडे यांनी सांगितले. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली की, महेश्वर मल्टीस्टेट बँकेच्या शाखा अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यरत असून ग्राहकांचा वाढता विश्वास लक्षात घेता संस्थेचा विस्तार सातत्याने सुरू आहे.

तसेच “सभासदांनी विश्वासाने ठेवलेला पैसा सुरक्षित राहावा यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध असून विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ दिला जाणार नाही,” असेही गावडे यांनी स्पष्ट केले.

या उद्घाटन समारंभासाठी पंचक्रोशीतील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, ग्रामस्थ, सभासद तसेच महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

नवीन शाखेमुळे विसापूर परिसरातील नागरिकांना बँकिंग व पतसंस्थेच्या सेवा अधिक सुलभ आणि वेगवान पद्धतीने उपलब्ध होणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *