पंधरा वर्षांच्या मागणीला मिळाला प्रतिसाद; गणेगाव दुमाला–अहिल्यानगर जोडणाऱ्या घोड नदीवरील पुलासाठी इस्टिमेट तयार करण्याचे निर्देश
Rjnews 27 मराठी – अल्लाउद्दीन अलवी
गणेगाव दुमाला : गेल्या पंधरा वर्षांपासून गणेगाव दुमाला येथे पुणे जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणाऱ्या घोड नदीवरील पुलाची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती. या मागणीची दखल घेत शिरूर-हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून पुलाच्या कामाचे इस्टिमेट तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गणेगाव दुमाला येथे घोड नदीवर पूल उभारला गेल्यास वडगाव रासाई, नागरगाव, मांडवगण फराटा, बाबुळसर तसेच गणेगाव दुमाला परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पुलामुळे दोन्ही जिल्ह्यांमधील दळणवळण अधिक सुलभ होण्याबरोबरच शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवासाचा वेळ व अंतर कमी होण्यास मदत होऊ शकते.विशेषतः दौंड तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेशी या परिसरातील शेतकऱ्यांना अधिक सुलभ संपर्क उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीमालाची वाहतूक, बाजारपेठेपर्यंत पोहोच आणि दैनंदिन व्यवहारांच्या दृष्टीने या पुलाचे महत्त्व मोठे ठरणार आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या मागणीची दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून पुढील कार्यवाहीसाठी निर्देश दिल्याबद्दल परिसरातील ग्रामस्थांनी आमदार माऊली आबा कटके यांचे आभार व्यक्त केले आहेत. पुलाचे इस्टिमेट, प्रशासकीय प्रक्रिया आणि त्यानंतरच्या मंजुरीच्या टप्प्यांना गती मिळावी, अशी अपेक्षाही ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







