अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव गणपती मंदिरात भक्तिमय वातावरण; सामूहिक अथर्वशीर्ष पठणासह महापूजा

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव गणपती मंदिरात भक्तिमय वातावरण; सामूहिक अथर्वशीर्ष पठणासह महापूजा

Rjnews 27 मराठी – रमेश बनसोडे 

रांजणगाव गणपती : अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील श्री महागणपती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटे पाच वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.

 

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या धार्मिक कार्यक्रमात भाविकांनी सहभाग घेत श्री महागणपतीचे दर्शन घेतले व अथर्वशीर्ष पठण केले.

 

यंदा पितृपक्षातील अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने नेहमीच्या तुलनेत भाविकांची गर्दी कमी प्रमाणात असल्याचे दिसून आले. भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळावे यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने नियोजन करण्यात आले होते. तसेच भाविकांसाठी पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

 

याबाबत देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. स्वातीताई दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून दर्शन व्यवस्था व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

 

दरम्यान, दुपारी १२ वाजता देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव यांच्या हस्ते श्रींची महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात देवस्थान ट्रस्टच्या वतीने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. फुलांच्या सजावटीमुळे मंदिर परिसराचे धार्मिक सौंदर्य अधिक खुलून दिसत होते.

 

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने श्री महागणपती भजनी मंडळ, रांजणगाव गणपती यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. भजनाच्या माध्यमातून मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

 

या धार्मिक कार्यक्रमास देवस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव, अध्यक्षा सौ. स्वातीताई पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष श्री. संदिप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव, चेअरमन दत्ताशेठ पाचुंदकर पाटील, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, पांडुरंग चोरगे, हिशोबणीस संतोष रणपिसे, जनसंपर्क अधिकारी, देवस्थान कर्मचारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

 

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त दिवसभर विविध धार्मिक उपक्रम पार पडल्याने श्री क्षेत्र रांजणगाव गणपती मंदिरात श्रद्धा, भक्ती आणि धार्मिक वातावरण अनुभवायला मिळाले.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *