आळंदीत द युवा ग्रामीण पत्रकार संघाचा तिसरा वर्धापन दिन उत्साहातमहाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रांतील ९८ मान्यवरांचा सन्मान
अल्लाउद्दीन अलवी | पुणे जिल्हा प्रतिनिधी

आळंदी, दि. २९ : पुणे जिल्ह्यातील आळंदी नगरीत द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२६’ उत्साहात पार पडला. मंगळवारी (दि. २९ सप्टेंबर) आळंदी-चाकण चौक येथील डांगे पंच हॉल मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात पत्रकारिता, सामाजिक कार्य, सांप्रदायिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुमारे ९८ मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे (अध्यक्ष, जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान), ह.भ.प. श्रीनाथ महाराज गोसावी (शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचे १४वे वंशज), ह.भ.प. रमेश महाराज वसेकर (श्री संत शिरोमणी सावता महाराजांचे १८वे वंशज) तसेच समाज कल्याण अधिकारी मनोज विठ्ठल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर महाराजांचा द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अन्सार शेख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. दादा महाराज सोनवणे, राज्याध्यक्ष शकील मनियार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष महेबुब सय्यद, एकता फाउंडेशनचे संस्थापक अनंत कराड, महिला राज्याध्यक्ष मंगल सासवडे, रोहित वाळके, जिल्हाध्यक्ष काशिनाथ आल्हाट, उपाध्यक्ष अल्लाउद्दीन अलवी यांच्यासह राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष गौरव करण्यात आला. आळंदी नगरीतील युवा उद्योजक ज्ञानेश्वर वहिले यांना राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कार, मेजर ह.भ.प. दादासाहेब महाराज मचाले यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार, ह.भ.प. हरिभाऊ महाराज नागवडे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट प्रवचनकार पुरस्कार, तर सरस्वती क्लासेसचे व्यवस्थापकीय संचालक राजकुमार जाधव यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याशिवाय पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसह विविध भागांत सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा, कला आणि आरोग्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
ग्रामीण भागातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेण्याच्या उद्देशाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा पदाधिकारी व सदस्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौठलेसर यांनी केले, तर आभार प्रदर्शन राज्याध्यक्ष शकील मनियार यांनी मानले.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







