डॉ. रवींद्र भोळे यांची प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल साने संगीत विद्यालयातर्फे सन्मान
Rjnews 27 मराठी – विकास साळुंके
उरुळी कांचन,(प्रतिनिधी):-उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यपदी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांची निवड झाल्याबद्दल साने संगीत विद्यालयाचे सर्वेसर्वा शिवराज साने यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राची भूमीचे पत्रकार बापुसो चौधरी उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना शिवराज साने म्हणाले, जेष्ठ समाजसेवक ह.भ.प डॉ.रवींद्र भोळे यांनी सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्य करत सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि सेवाभावी वृत्तीचा निश्चितच रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून नागरिकांना लाभ होईल. त्यांची झालेली निवड ही त्यांच्या सामाजिक कार्याची पावती आहे. यावेळी पत्रकार बापुसो चौधरी यांनीही डॉ. भोळे यांचे अभिनंदन करत, ज्येष्ठ समाजसेवक म्हणून डॉ. रवींद्र भोळे यांचे कार्य उल्लेखनीय आहे. आरोग्य क्षेत्राशी संबंधित समितीवर काम करण्याची मिळालेली संधी ते निश्चितच सामाजिक बांधिलकीने पार पाडतील, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. डॉ.रवींद्र भोळे यांच्या निवडीबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







