सिद्धिविनायक मंदिरात संजय रामराव नागवडे पाटील यांना आरतीचा मान

सिद्धिविनायक मंदिरात संजय रामराव नागवडे पाटील यांना आरतीचा मान

बाभुळसर बुद्रुक येथे गणेश भक्तीचा उत्साह; तीन कुटुंबांतील जोडप्यांचा आरतीत सहभाग

अल्लाउद्दीन अलवी | बाभुळसर बुद्रुक प्रतिनिधी

शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथील मानाचा व नवसाला पावणारा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात धार्मिक वातावरणात आरतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बाभुळसर बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माजी संचालक संजय रामराव नागवडे पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी निर्मलाताई नागवडे यांना आरतीचा मान देण्यात आला.

यासोबतच सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ नवनाथ नागवडे व त्यांच्या सुविद्य पत्नी मनीषाताई नागवडे (ग्रामपंचायत सदस्या), प्रगतशील शेतकरी अशोक रामराव नागवडे पाटील, युवा कार्यकर्ते किशोर पोपट नागवडे व त्यांच्या सुविद्य पत्नी प्रगतीताई नागवडे, तसेच दूध उत्पादक शेतकरी सागर बाळासाहेब भंडलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी कोमल भंडलकर या कुटुंबांतील जोडप्यांनाही आरतीचा मान देण्यात आला.

आरतीच्या वेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी सरपंच दिपालीताई महेंद्र नागवडे यांच्यासह मोठ्या संख्येने गणेशभक्त, महिला भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

आरतीनंतर उपस्थित गणेशभक्तांना मोदक प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळच्या सत्रात भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. भजनाच्या स्वरांनी मंदिर परिसर भक्तिमय झाला. यावेळी भाविकांनी **‘गणपती बाप्पा मोरया’**चा जयघोष करीत श्री सिद्धिविनायकाच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होत दर्शन घेतले.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *