शिरूर तालुक्यातील साहित्यिकांच्या वतीने दंगलकार नितीन चंदनशिवे यांचा सन्मान

शिरूर तालुक्यातील साहित्यिकांच्या वतीने दंगलकार नितीन चंदनशिवे यांचा सन्मान

 

शिरूर प्रतिनिधी

 

शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे साई गणेश मित्र मंडळाच्या वतीने दिपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जपून गणेशोत्सवानिमित्त विविध विधायक उपक्रम राबवत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण आणि अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था शिरूर यांच्या वतीने नितीन चंदनशिवे यांचा साहित्यिक लेखक प्रा. कुंडलिक कदम यांचे समासातल्या नोंदी आणि युवा कवी आकाश भोरडे यांचे झालं बाटुकाचं जिणं ही पुस्तके, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरूर ग्रामीण आणि अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था शिरूर हे राबवित असलेल्या साहित्यविषयक उपक्रमाची माहिती बालकुमार संस्थेचे अध्यक्ष राहुल चातुर, अध्यक्ष शिरूर तालुका ग्रंथालय संघ तथा प्रमुख कार्यवाह अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था शिरूर विवेकानंद फंड आणि साहित्य परिषदेचे माजी कार्याध्यक्ष प्रा कुंडलिक कदम, युवा कवी आकाश भोरडे यांनी दिली. यावेळी साहित्य चळवळ वाढविण्यासाठी साहित्यिकांनी पुढे येणे काळाची गरज असुन साहित्यिकच समाज बदलवु शकतो असे प्रतिपादन नितीन चंदनशिवे यांनी केले.

यावेळी प्रा.अमोल चांदणे, बाळासाहेब कुंभार, अनिल नरके, साई गणेश मित्र मंडळाचे संस्थापक दिपक पवार, प्रशांत गायकवाड, भूषण गायकवाड, अतुल ढसाळ, सुमित गायकवाड, अशोक गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, सुरेश माघाडे, आकाश माघाडे, विराज पवार आदी उपस्थित होते.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *