प्रतिनिधी -विजय कांबळे

नागरगाव – शिरूर:क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या समतावादी विचारांचा वारसा पुढे नेणारे ज्येष्ठ विचारवंत,लेखक व सामाजिक प्रबोधनकार प्रा. हरी नरके यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले विचार मंच,तळेगाव ढमढेरे यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत सदस्य ॲड.सुरेश भुजबळ व सेवानिवृत्त तलाठी कैलास दादा नरके यांच्या मार्गदर्शनाखाली सावतामाळी मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.उपबाजार समितीच्या आवारातील क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.प्रारंभी दीपप्रज्वलन झाल्यानंतर स्वर्गीय प्रा.हरी नरके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्या मंदिरचे सेवानिवृत्त कलाशिक्षक प्रवीणकुमार जगताप यांना फुले पगडी,पंचा, मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन ‘प्रा. हरी नरके पुरस्कार’ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी संत साहित्याच्या अभ्यासक व्याख्याते संभाजी गदादे यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक क्रांतीचा तसेच प्रा. हरी नरके यांच्या वैचारिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा सखोल अभ्यास करून तो समाजापर्यंत पोहोचविण्यात प्रा. हरी नरके यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.सामाजिक समता,शिक्षण, स्त्रीशिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर वैचारिक प्रबोधन केले.
पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून सामाजिक परिवर्तनाच्या विचाराला पर्यावरण संवर्धनाची जोड देणे काळाची गरज असल्याचे प्रवीणकुमार जगताप यांनी सांगितले.
कार्यक्रमास आरएसएसचे विभाग संघचालक संभाजी गवारे, जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई गव्हाणे,ॲड. शांताराम दोरगे,समता परिषदेचे सोमनाथ भुजबळ,घोडगंगा सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष पोपट भुजबळ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ, विश्वास ढमढेरे, ओबीसी सेलचे बाळासाहेब लांडे, सोमनाथ कुदळे, उद्योजक नवनाथ भुजबळ,संदीप ढमढेरे,शिवसेनेच्या चेतनाताई ढमढेरे,कैलास नरके,महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे दादासाहेब गवारे, विठ्ठलवाडीचे सोसायटीचे माजी उपाध्यक्ष रायचंद शिंदे,उपाध्यक्ष ॲड.संतोष गवारे,माजी उपसरपंच दिलीप गवारे,तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब गवारे,उद्योजक युवराज गवारे,विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महादेव गवारे,विठ्ठल गवारे,सामाजिक कार्यकर्ते मधुकर दोरगे,सुनील गवारे,महादेव भुजबळ,सुभाष नरके,प्रियंका गवारे,रामभाऊ गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक उपस्थित होते. महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे उपसचिव किशोर जकाते यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा आढावा घेतला.सूत्रसंचालन श्रीकांत नरके यांनी केले,तर आभार शंकर भुजबळ यांनी मानले.




