तृप्ती फिल्मच्या निर्मात्यांच्या कन्येचा शुभविवाह श्रीगोंद्यात थाटामाटात संपन्न तृप्ती फिल्म्स परिवाराने दिला सामाजिक एकतेचा संदेश
प्रतिनिधी – विजय कांबळे

तृप्ती फिल्मच्या निर्मात्यांच्या कन्येचा शुभविवाह श्रीगोंद्यात थाटामाटात संपन्न झाला आहे या निमित्ताने तृप्ती फिल्म्स परिवाराने सामाजिक एकतेचा संदेश देत एक नवा पायंडा पाडला आहे.
दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी गव्हाणेवाडी (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथील गुरुकृपा लॉन्स येथे तृप्ती फिल्मचे निर्माते, दिग्दर्शक व लेखक रामदास राऊत यांची कन्या चि.सौ.कां तृप्ती यांचा विवाह सोहळा (श्री सोमनाथ लक्ष्मण जाधव, उरुळी कांचन) यांचे चिरंजीव शुभम यांच्यासोबत अत्यंत उत्साहात व थाटामाटात पार पडला.
सांस्कृतिक वातावरण, आकर्षक सजावट आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे हा सोहळा उपस्थितांसाठी खास ठरला.
या प्रसंगी शिरूरच्या नगराध्यक्षा सौ ऐश्वर्याताई अभिजीत पाचरणे, तसेच खासदार निलेश लंके साहेब यांचे पिताश्री माननीय ज्ञानदेव लंके, गुरुजी श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे आणि आमदार बापूसाहेब गावडे यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदांपत्याला शुभाशिर्वाद दिले.
मुंबईहून आलेल्या लेखिका व कवयित्री संध्याताई गायकवाड तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची व अभिनेते अमोल गायकवाड यांची उपस्थितीही लक्षवेधी ठरली.
तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेशजी क्षीरसागर, नगरसेवक नितीन दादा पाचरणे, कॅप्टन थेऊरकर आणि इतर मान्यवरांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार अमोल कोल्हे, आमदार बाबाजी शेट काळे व माजी आमदार अशोकराव पवार यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देत आपली भावना व्यक्त केली.
कार्यक्रमात सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी हजेरी लावली. साई समर्थ नागरी पतसंस्थेचे चेरमन मा.वसंतराव जगताप, संचालक मा.संजय विश्वासराव, दिग्दर्शक मा.काळुराम ढोबळे, तसेच विविध भागांतून आलेले कलावंत, अभ्यासक आणि मित्रपरिवार यांनी उपस्थिती दर्शवली. शाहीर रमेश खुडे, मा.पापाबाई बोरगावकर, प्रा. संजय थोरात आणि राजेंद्र डी मोरे , बारामती यांची उपस्थितीही विशेष ठरली.
अतिशय आदर्शवत विवाहपूर्वी नववरवधूंनी
छत्रपती शिवाजी महाराज,
छत्रपती शाहू महाराज ,महात्मा ज्योतिराव फुले , सावित्रीबाई फुले ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,संत सेना यांना अभिवादन केले.
महापुरुषांच्या विचारांचा आदर आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश या विवाहातून देण्यात आला, त्यामुळे कार्यक्रमाला वेगळे सामाजिक महत्त्व प्राप्त झाले.
राऊत आणि जाधव परिवारातील नातेवाईक, मित्रमंडळी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली. आनंद, आपुलकी आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर मी सातत्याने मनोरंजनपर ऑर्केस्ट्रा नवीन जुने गाणी सादर करीत होता. माणूसपणाला धरून असलेला,
स्वतःपेक्षा इतरांना जास्त मानसन्मान देणारा हा विवाह सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील. दोन्ही परिवाराने उपस्थित सर्वांचे आभार मानले.
या शुभविवाहाचे जर सार कशामध्ये असेल, तर दोन्हीही परिवारांनी जपलेली असंख्य माणसे कडक उन्हात देखील शिरूरकडे धावत आली. राऊत आणि जाधव यांच्या सामाजिक प्रतिमेचे दर्शन घडले.
शुभविवाह सोळावा हे एक निमित्त असते, आधुनिक युगात विवाहात खर्च,माणसं सर्वच गोष्टी मर्यादित होत असताना ,आपलेपणा ,जिव्हाळा यांच्या देवाणघेवाणीतून निर्माण होणारा आनंद , गाठीभेटी ह्या चिरकाल टिकत असतात, याची जाणीव आदरणीय राऊतसर यांनी करून दिली.




