इनामगाव येथे प्राणघातक हल्ला – १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इनामगाव येथे प्राणघातक हल्ला – १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे एका भीषण प्रकरणात एक महिला व तिच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. फिर्यादी सौ. रूपाली आतीश चव्हाण (वय 20 वर्षे, व्यवसाय – मजुरी, रा. इनामगाव) यांच्या तक्रारीवरून शिरूर पोलीस ठाण्यात 10 आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा तपशील:

ही घटना 6 मे 2025 रोजी रात्री 8 वाजेपासून ते 7 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत घडली. इनामगाव गावातील राहत्या घरासमोर फिर्यादी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य झोपलेले असताना आरोपींनी संगनमत करून बेकायदेशीर जमाव जमवला. आरोपी दिनेश काळे याने पूर्वी फिर्यादी रूपाली यांची छेड काढली होती. त्यानंतर झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी हल्ला केला.

आरोपींची नावे:

1. मनिशा अंकुष काळे (रा. मांडवगण फराटा)

2. दिनेश अंकुष काळे

3. अक्षय अंकुष काळे

4. हरीदास संपत भोसले

5. लैलाबाई हरीदास भोसले

6. लल्या हरीदास भोसले

7. कबई अंकुष काळे (रा. गणेगाव दुमाला)

8. चिंटू काळे (रा. दौंड टोल नाक्याजवळ)

9. प्रदीप (पूर्ण नाव माहीत नाही, रा. श्रीगोंदा)

10. लाली नवनाथ चव्हाण (रा. गारमाळ, मांडवगण फराटा)

 

हल्ल्यात वापरलेली हत्यारे:
लोखंडी कोयता, लोखंडी रॉड, सतूर, लाकडी हॉकी स्टिक, लाकडी दांडके व दगड.

जखमींची नावे:

1. पवन भुजाबा चव्हाण

2. षिन्नर गुजाबा चव्हाण

3. सुजाता षिन्नर चव्हाण

4. बापु काळे

5. धनराज काळे

6. चिप्पट भुजाबा चव्हाण

7. शुभम पवन चव्हाण

 

गुन्हा दाखल:
शिरूर पोलीस स्टेशन गु.र.नं. 310/2025, भारतीय दंड विधान कलम 109, 118(2), 118(1), 74, 189(2), 191(2), 191(3), 190, 352, 351(2)(3) तसेच आर्म्स अ‍ॅक्ट 3(5), 4, 25, 27 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास:
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नकाते सो. करत असून, प्रभारी अधिकारी पोनि केंजळे सो. आहेत. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे व आरोपींच्या अटकेसाठी हालचाली सुरू आहेत.

नोट: संबंधित घटनेचा तपास अजून सुरू असून, पुढील तपशील पोलीस तपासानंतर उघड होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *