अजितदादा जनसंवाद विकास अभियाना’अंतर्गत केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला पदाधिकाऱ्यांची भेट; आरोग्य सुविधांचा घेतला आढावा*

*‘अजितदादा जनसंवाद विकास अभियाना’अंतर्गत केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला पदाधिकाऱ्यांची भेट; आरोग्य सुविधांचा घेतला आढावा*

नागरिकांच्या समस्या जाणून घेत आरोग्य सेवा अधि सक्षम करण्याचा प्रयत्न करणार – जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे

 

केडगाव : ‘अजितदादा जनसंवाद विकास अभियाना’अंतर्गत केडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आरोग्य केंद्रातील विविध समस्या आणि उपलब्ध सुविधांची पाहणी केली.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष वैशालीताई नागवडे, बांधकाम सभापती दीपालीताई हुलावळे, जिल्हा परिषद सदस्य गणेश थोरात, पंचायत समिती सदस्य धनंजय शेळके, नितीन दोरगे तसेच दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

या भेटीदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सुविधा, नागरिकांना मिळणाऱ्या वैद्यकीय सेवा, आवश्यक साधनसामग्री तसेच रुग्णांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत माहिती घेण्यात आली. आरोग्य केंद्रात येणाऱ्या नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सेवा मिळावी, यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत पदाधिकाऱ्यांनी संबंधितांशी चर्चा केली.

 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे म्हणाले की, ‘अजितदादा जनसंवाद विकास अभियाना’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. केवळ समस्या ऐकून न घेता त्या सोडविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील. समाजासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.

 

या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देऊन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व्हावी आणि सर्वसामान्य नागरिकांना स्थानिक पातळीवरच चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights