माजी आमदार रमेश थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक उपक्रम; दिवेकर कुटुंबीयांकडून पुण्यस्मरणानिमित्त विधायक उपक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी – विकास साळुंके
दौंड : बोरी पारधी- कैलासवासी किसन नाना गंगाराम दिवेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त बोरमालनाथ मंदिर येथील गोशाळेत जनावरांना मोफत हिरवा चारा वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता. दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी देऊळगाव गाडा गावचे सरपंच राजवर्धन जगताप तसेच देवस्थानचे पुजारी कैलास आबा गुरव सामाजिक कार्यकर्ते सातपुते अण्णा यांनी किसन नाना दिवेकर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी पुण्यस्मरणानिमित्त जनावरांना हिरवा चारा वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आल्याने उपस्थितांनी दिवेकर कुटुंबीयांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.या कार्यक्रमाला गावातील सामाजिक कार्यकर्ते, पाहुणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी किसन नाना दिवेकर यांचे चिरंजीव तथा दौंड पंचायत समितीचे सदस्य प्रदीप दिवेकर आणि वरवंड विकास सोसायटीचे संचालक संदीप दिवेकर यांनी उपस्थित मान्यवर, पाहुणे व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केलपुण्यस्मरणाच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम राबवून दिवंगत व्यक्तीच्या स्मृती जपण्याचा दिवेकर कुटुंबीयांचा हा प्रयत्न उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560





