गती; पुण्यात ६८ परीक्षार्थींचा सहभाग

प्रशिक्षित बौद्धाचार्य धार्मिक चळवळ गतिमान करू शकतो………आयु.भिकाजीं कांबळे राष्ट्रीय सचिव

 

विजय कांबळे – प्रतिनीधी 

 

 नागरगावं- धार्मिक कार्य करण्यासाठी प्रशिक्षित वर्गाची खुप गरज आहे म्हणून संस्थेत तरुण वर्ग, सुशिक्षित व्यक्ती यांची शिबीरे घेऊन प्रत्येक वॉर्ड तिथे केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य करण्याची गरज आहे संस्थे मधेय अभ्यासू वर्ग निर्माण होत आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने 1तरी विचाराचा वारसदार तयार करावा असे मार्गदर्शन संस्थेचे राष्ट्रीय सचिव भिकाजीं कांबळे यांनी केले

     तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही सूर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांनी बौद्धाचार्य निर्मिती करून एक संस्थेला चांगला प्रचारक दिला त्यानंतर महाउपासिका मीराताई यशवंतराव आंबेडकर यांनी 1977 पासून 45 वर्षे सतत कार्यरत राहून अनेक राज्यात संस्थाचे बळकटीकरण केलं पुरुष महिला यांच्यामध्ये अनेक अधिकार निर्माण केले आणि चळवळ गतिमान केले आणि त्याचबरोबर आता संस्थेचे ट्रस्टी कार्याध्यक्ष डॉक्टर भीमरावसाहेब यशवंतराव आंबेडकर यांनी अनेक मंडळे संस्था तरुण वर्ग इतर समाज यांना जोडून बीएसआय 25 च्या नियमानुसार संस्था वाढीसाठी खूप मोठे योगदान देत आहेत म्हणूनच त्याचे फलित आज महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी एकाच वेळी 62 जिल्ह्यांमध्ये बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षा व केंद्रीय शिक्षक पूर्व (सी टी ई टी) परीक्षा मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहे असे मोलाचे मार्गदर्शन संस्थेच्या महाराष्ट्र राज्य प्रचार उपाध्यक्ष सुनंदाताई वाघमारे यांनी केले

      दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पुणे महानगर जिल्हा व पुणे जिल्हा पूर्व महिला पुरुष कार्यकारणी यांच्या अंतर्गत दिनांक ८ नोव्हेंबर 2026 रोजी मिलिंद बुद्ध विहार ताडीवाला रोड येथे बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षा व केंद्रीय शिक्षक-शिक्षिका पूर्व परीक्षा घेण्यात आली यावेळेस या परीक्षेत बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षेसाठी एकूण 33 बौद्धाचार्य व केंद्रीय शिक्षक – शिक्षिका परीक्षेसाठी 35 परीक्षार्थी बसले होते ही परीक्षा लेखी आणि तोंडी या दोन सत्रात झाली वेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्कार उपाध्यक्ष मोहन रोकडे होते, सूत्रसंचालन पुणे जिल्हा पूर्व सरचिटणीस संतोष आरवडे यांनी केले प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र सचिव बाळासाहेब गायकवाड, महाराष्ट्र संघटक विजय ओव्हाळ, महाराष्ट्र सदस्य संजय भोसले तसेच पुणे महानगर जिल्हा चे अध्यक्ष राजरतन थोरात,पुणे जिल्हा पूर्वचे अध्यक्ष बी जी घाटे, पुणे जिल्हा महानगरचे महिला अध्यक्ष सुनीताताई रोकडे,पुणे जिल्हा पूर्व महिला अध्यक्ष सुजाताताई ओव्हाळ पिंपरी चिंचवडच्या महिला अध्यक्ष मंदाताई गजरे, तसेच या परीक्षेसाठी पुणे महानगरचे सहपरिक्षक म्हणून दादासाहेब रणपिसे व विठ्ठल कांबळे यांनी सहकार्य केले परीक्षेचे नियोजन करण्यासाठी पुणे महानगर जिल्हा चे संस्कार सचिव संघदीप लांडगे व संस्कार सचिव संभाजी गरड यांचे मोलाचे योगदान लाभले पुणे महानगर जिल्हा, पूणे जिल्हा पूर्व,पश्चिम पिंपरी चिंचवड या चारही जिल्ह्यातील शिक्षक शिबिरार्थी उपस्थित होते या परीक्षेला पुणे जिल्हा पूर्व कोषाध्यक्ष रवींद्र कदम, संरक्षण उपाध्यक्ष नागसेन ओव्हाळ, दिनेश गायकवाड सखाराम ओव्हाळ, परमेश्वर कदम, पुणे महानगर जिल्ह्याचे प्रचार सचिव दिलीप कांबळे, संजय शिंदे अमोल धनवडे खेड चे दादू सोनवणे, किसन रणदिवे यांचे योगदान लाभले समता सैनिक दलाचे सैनिक कार्यक्रम पार पाडण्यास मदत झाली

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *