लेखकाकडूनच शिकले विद्यार्थी पाठ्यपुस्तकातील धडा

लेखकाकडूनच शिकले विद्यार्थी पाठ्यपुस्तकातील धडा

पुणे दि. 06 (प्रतिनिधी)-Rjnews 27 मराठी 

     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौफुला येथे प्रसिद्ध लेखक सचिन बेंडभर यांनी भेट देऊन इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना बचत धडा शिकवला. यावेळी अचानक पाठ्यपुस्तकातील पाठाच्या पानांतून लेखकाला समोर पाहून विद्यार्थी अचंबित झाले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद अवर्णनीय होता. यावेळी बेंडभर यांनी मुलांना गोष्टीची पुस्तके भेट म्हणून दिली. 

       पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौफुला येथील विद्यार्थ्यांशी लेखक सचिन बेंडभर यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बचत या पाठाविषयी चर्चा झाली. यावेळी कथेतील उपक्रम, पात्रांची निवडलेली नावे आणि कथेचा केलेला भावनिक शेवट यावरही चर्चा झाली. प्रत्यक्ष लेखकाकडून धडा शिकल्याने मुले आनंदून गेली. विद्यार्थ्यांना बचत धडा शिकवून बचतीचे महत्त्व सांगितले. पाठ्यपुस्तकातील लेखक प्रत्यक्ष समोर पाहून विद्यार्थी अचंबित झाले. मुलांनी देखील लेखकाशी संवाद साधून मनमोकळ्या गप्पा मारल्या. 

     विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी. मोबाईल सोडून त्यांनी वाचनाकडे वळावे, यासाठी बेंडभर यांनी मुलांना काही गोष्टीची पुस्तके भेट म्हणून दिली. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे विद्यार्थी भारावून गेले.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक माने, स्वागत माधुरी गावडे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक प्रदीप ढोकले यांनी मानले.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *