प्रयोगातून विज्ञानाची गोडी; ताथवडे शाळेत अनोखा उपक्रम विश्वास बागुल यांनी विद्यार्थ्यांना करून दिले विविध प्रयोग खेळता-खेळता विद्यार्थ्यांनी समजून घेतली विज्ञानाची संकल्पना

 

ताथवडे शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवले खेळातून विज्ञान*

 

पुणे दि. 6 (प्रतिनिधी)-Rjnews 27 मराठी 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताथवडे येथे विश्वास बागुल यांनी छोट्या छोट्या विज्ञान प्रयोगांच्या माध्यमातून खेळातून विज्ञान या विषयावर मनोरंजक पद्धतीने विज्ञानातील छोटे छोटे प्रयोग सादर करत विद्यार्थ्यांना प्रयोगातून विज्ञानाच्या गमतीजमती सांगितल्या. या कार्यक्रमाला शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मुळशी तालुक्यात उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताथवडे येथे विद्यार्थ्यांसाठी नेहमीच आनंददायी उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांना मनोरंजक पद्धतीने विज्ञानाचा अनुभव घेता यावा यासाठी विश्वास बागुल यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बागुल यांनी गती गतीचे प्रकार आंदोलिक गती म्हणजे काय या गोष्टी समजून घेत प्रयोगाच्या सहाय्याने मनोरंजक पद्धतीने समजून सांगितले. काड्यांच्या साह्याने कोण कसा तयार होतो, कोणाचे प्रकार समजून सांगत लघुकोन, काटकोन आणि विशाल कोणाची संकल्पना विद्यार्थ्यांना समजून दिली. तसेच हवेच्या दाबाने पाणी कसे बाहेर पडते हे प्रयोगातून समजून दिले.

यावेळी मुख्याध्यापक संगिता सूर्यवंशी, कविता मोहिते, भारती जाधव, जयश्री दांगडे, सारिका भालेकर, शिवप्रसाद गुट्टे, प्रिती चव्हाण आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर उपस्थित होते. मारुंजी केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश साबळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. गटशिक्षणाधिकारी संग्राम पाटील आणि गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी शिक्षकांचे अभिनंदन करत शाळेला शुभेच्छा दिल्या आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांनी केले. तर मुख्याध्यापक संगिता सूर्यवंशी यांनी आभार मानले.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *