दौंडमध्ये झाडाझुडपात गोमांस व तीन जनावरे आढळली; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

दौंडमध्ये झाडाझुडपात गोमांस व तीन जनावरे आढळली; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Rjnews 27 मराठी – विकास साळुंके 

दौंड : दौंड शहरातील खाटीक गल्ली परिसरात इदगाह मैदानाजवळ झाडाझुडपात गोमांस आणि तीन जिवंत जनावरे आढळून आल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी दौंड पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ५.४५ वाजता खाटीक गल्ली येथील इदगाह मैदानाच्या शेजारील झाडाझुडपात पोलिसांना सुमारे ३०० किलो गोमांस आढळून आले. त्याची अंदाजे किंमत ४८ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

तसेच घटनास्थळी दोन जर्सी खोंड आणि एक जर्सी कालवड अशी तीन जिवंत जनावरे आढळून आली. या जनावरांना कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे. त्यांच्यासाठी चारा, पाणी तसेच औषधोपचाराची योग्य व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

 

या प्रकरणात दीपक जॉर्ज पिल्ले, आसिफ कासम कुरेशी आणि कय्यूम कुरेशी या तिघांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची चाहूल लागताच संबंधित व्यक्ती घटनास्थळावरून पसार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

 

या कारवाईत गोमांस आणि जिवंत जनावरे असा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सागर म्हेत्रे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास भाऊसाहेब लोकरे करीत आहेत.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *