उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; प्रथमेश अशोक ढाकणे यांचा ‘युवारत्न’ पुरस्काराने सन्मान

उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; आळंदी येथे ‘युवारत्न’ पुरस्काराने प्रथमेश ढाकणे सन्मानित

Rjnews27 मराठी – शिरूर 

शिरूर प्रतिनिधी : द युवा ग्रामीण पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन भूमी आळंदी येथे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उद्योग क्षेत्रात अतिशय कमी वयात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल प्रथमेश अशोक ढाकणे यांना ‘युवारत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

प्रथमेश ढाकणे हे ‘प्रथमेश मसाले प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या संचालक मंडळावर गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत आहेत. कंपनीच्या व्यवसायवृद्धीसोबतच ग्राहकांना दर्जेदार व रसायनविरहित मसाले उपलब्ध करून देण्यासाठी ते विशेष प्रयत्न करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

ग्राहकांचा विश्वास, उत्पादनाची गुणवत्ता आणि व्यवसायाचा विस्तार या बाबींवर भर देत कंपनीचा विस्तार महाराष्ट्रासह देशभरात वेगाने होत असल्याचे ढाकणे यांनी सांगितले. आगामी पाच वर्षांत छोट्या गावांपासून मोठ्या शहरांपर्यंत ‘प्रथमेश मसाले’ची ओळख निर्माण करण्याचा विश्वास त्यांनी पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केला.

 

उद्योग क्षेत्रात कार्यरत असताना तरुण वयात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

 

या कार्यक्रमास संत एकनाथ महाराजांचे भौदावे वंशज श्रीनाथ गौसार महाराज, श्री संत शिरोमणी सावता महाराज वसेकर, जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थेचे विश्वस्त व अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, समाज कल्याण अधिकारी पुणे मनोज जाधव, एकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनंत कराड, द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शकील मणियार, पुणे ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य सचिव बाळासाहेब कौठाळे, महिला अध्यक्ष मंगल सासवडे यांच्यासह जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी तसेच संकेत दाभाडे, श्रीवर्धन हगवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमास पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *