“पंडिता रमाबाईंच्या सेवेच्या वटवृक्षाला पर्यावरण संवर्धनाची जोड; सरला शर्मा, सुरज शर्मा व राजन चित्रे यांच्या पुढाकारातून ३०० झाडांची भेट”

पंडिता रमाबाई मुक्ती मिशनच्या १२७व्या वर्धापनदिनानिमित्त ३०० वृक्षांची भेट

Rjnews27 मराठी – विकास साळुंके 

बोरी पारधीच्या उपसरपंच सरला शर्मा, सामाजिक कार्यकर्ते सुरज शर्मा व राजन चित्रे यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण

 

बोरी पारधी : पंडिता रमाबाई मुक्ती मिशनच्या ऐतिहासिक चर्चने आपल्या स्थापनेची १२७ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रार्थना सभेनंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. बोरी पारधीच्या उपसरपंच सरला राजेंद्र शर्मा, सामाजिक कार्यकर्ते सुरज शर्मा तसेच राजन चित्रे यांच्या माध्यमातून मुक्ती मिशन परिसरासाठी ३०० झाडांची व्यवस्था करण्यात आली.

 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पास्टर विजय आल्हाट, मिशन डायरेक्टर अनिल फ्रान्सिस, ॲडव्हायझर लॉरेन फ्रान्सिस, बोरी पारधी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सरला शर्मा, पास्टर के. प्रसाद, पास्टर प्रकाश साळवे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सुरज दादा शर्मा, राजन चित्रे, कलिका ताई चित्रे, डॅनियल वानखेडे, केदारी दादा तसेच मंडळीतील अनेक सभासद उपस्थित होते.

 

पंडिता रमाबाई मुक्ती मिशन, कृष्णाबाई स्मारक हॉस्पिटल आणि मनोरमा मेमोरियल स्कूल यांच्यासाठी वृक्षारोपण करण्याच्या उद्देशाने सुरज शर्मा व राजन चित्रे यांच्या माध्यमातून ३०० झाडांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यापैकी अनेक झाडांचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितांच्या सहभागातून वृक्षारोपण करण्यात आले.

 

मुक्ती मिशनच्या ऐतिहासिक वाटचालीचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला. पंडिता रमाबाई यांनी समाजसेवेच्या माध्यमातून लावलेले सेवेचे रोपटे आज १२७ वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत वटवृक्षासारखे विस्तारले आहे. या कार्याची परंपरा पुढे नेत वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

 

मुक्ती मिशनच्या स्थापनेच्या १२७व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित विशेष प्रार्थना सभा आणि त्यानंतर झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांनी पंडिता रमाबाई यांच्या कार्याची आठवण करून त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव केला.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *