खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त मांडवगण फराटा येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
Rjnews 27 मराठी – बालाजी कांबळे
मांडवगण फराटा : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल दादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त मांडवगण फराटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त योगेश भैय्या फराटे मित्र परिवाराच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मांडवगण फराटा येथील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन वाढदिवसाचा खर्च केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरता मर्यादित न ठेवता शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली.
योगेश भैय्या फराटे मित्र परिवाराच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून खासदार डॉ. अमोल दादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







