अनुभवसंपन्न पत्रकार कांताभाऊ राठोड यांची ‘सुवर्णयुग’ दैनिकाच्या पुणे जिल्हा कार्यकारी संपादकपदी निवड

प्रतिनिधी – शामराव जगताप
पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व दीर्घ अनुभवाच्या जोरावर सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार कांताभाऊ राठोड यांची ‘सुवर्णयुग’ दैनिक वृत्तपत्राच्या पुणे जिल्हा कार्यकारी संपादकपदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती दैनिकाचे संपादक लहुजी शिंदे यांनी जाहीर केली.
कांताभाऊ राठोड यांनी पत्रकारिता क्षेत्रात अनेक वर्षे विविध माध्यमांतून प्रभावी कामगिरी बजावली आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कामामुळे आणि ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडण्याच्या कार्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे ‘सुवर्णयुग’ दैनिकाच्या पुणे जिल्ह्यातील वृत्तांकनाला अधिक बळकटी मिळणार असल्याचे मानले जात आहे.
राठोड हे झेप फाउंडेशन, पुणे (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक अध्यक्ष असून त्यांनी समाजकार्यात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. तसेच युवा ग्रामीण पत्रकार संघ (कार्यक्षेत्र – संपूर्ण भारत) मध्ये महाराष्ट्र प्रदेश सहसचिव म्हणूनही ते कार्यरत आहेत. तत्सम, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय सचिव म्हणूनही त्यांनी संघटनात्मक कार्यात मोलाचे योगदान दिले आहे.
पत्रकार म्हणून त्यांनी पोलीस तपास व क्राईम रिपोर्टिंग क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बाळकडू, सेवाशक्ती दैनंदिन तसेच अजिंक्य महाराष्ट्र न्यूज यांसारख्या माध्यमांतून त्यांनी प्रतिनिधी म्हणून काम करत अनेक महत्त्वाच्या बातम्या प्रकाशात आणल्या आहेत.
कांताभाऊ राठोड यांच्या या निवडीबद्दल विविध सामाजिक, पत्रकारिता व राजकीय क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *