शिरूरमध्ये बोकड चोरीची घटना उघड; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

| शिरूर तालुक्यातील मंगलमुर्तीनगर परिसरात घरासमोर बांधून ठेवलेल्या बोकडांची चोरी झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत जावेद अब्दुलगणी शेख (वय 42, व्यवसाय फिटर, रा. मंगलमुर्तीनगर, शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, दिनांक 26 मे 2026 रोजी रात्री अडीच वाजल्यापासून सकाळी सव्वासहा वाजेपर्यंतच्या दरम्यान अज्ञातरीत्या त्यांच्या घरासमोरून सुमारे 70 हजार रुपये किंमतीचा चॉकलेटी-पांढऱ्या रंगाचा बोकड चोरीस गेला.
या घटनेत फिर्यादी यांच्यासह रमीज नजीर शेख, जमीर सय्यद, मन्सूर मेहबूब अन्सारी आणि तौसीफ युसुफ खान यांचेही बोकड चोरीला गेल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चौकी ईश्वर भोसले, आर्यन एअरफोर्स पवार, सोहम रामू भोसले आणि देवदास जीवदास काळे या चौघांवर संशय व्यक्त करण्यात आला असून, सर्व आरोपी पाण्याची टाकी परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *