कान्हूर मेसाईच्या विद्याधाम हायस्कूलने बारावीच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली.

कान्हूर मेसाईच्या विद्याधाम हायस्कूलने बारावीच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली.

Rjnews27marathi
कान्हूर मेसाई : विद्या विकास मंडळाचे विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कान्हूर मेसाई येथील इयत्ता बारावी विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य श्री. विनोद शिंदे यांनी दिली.
विज्ञान शाखेमध्ये ईश्वर संजय पिंगळे यांनी ७२.३३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. साक्षी बाळू नरवडे ७०.६७ टक्के गुणांसह द्वितीय तर अतिश नितीन बोऱ्हाडे यांनी ६५.६७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
वाणिज्य शाखेमध्ये समृद्धी गणपत धुमाळ यांनी ८३.१७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. अनुजा रविंद्र नाणेकर यांनी ७४.३३ टक्के गुणांसह द्वितीय तर दिपाली ज्ञानेश्वर वाघोले यांनी ७२.८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा अंजलीताई घोलप, सचिव सदाशिवराव पुंडे, सर्व संचालक मंडळ, सरपंच तसेच ग्रामस्थांनी केले.
यावेळी प्राचार्य श्री. विनोद शिंदे म्हणाले, “विज्ञान व वाणिज्य या दोन्ही शाखांचा निकाल शंभर टक्के लागणे ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची व गौरवास्पद बाब आहे. या यशामागे आमच्या कष्टाळू, अनुभवी व होतकरू प्राध्यापक वर्गाचे मोलाचे योगदान आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त तास घेऊन अभ्यासक्रमाची सखोल तयारी करून घेतली. प्रत्येक विषयाच्या किमान पाच सराव प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करता आली.”
“विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य तसेच विद्या विकास मंडळ आणि योजक संस्था, निगडी पुणे यांच्या पाठबळामुळेच हा उल्लेखनीय निकाल साध्य झाला आहे,” असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *