सासवडमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती जल्लोषात; ५ हजार मिसळ-पाव वाटपातून सामाजिक ऐक्याचा संदेश

सासवडमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती जल्लोषात; ५ हजार मिसळ-पाव वाटपातून सामाजिक ऐक्याचा संदेश
सासवड (ता. पुरंदर) | प्रतिनिधी – शाम जगताप
सासवड शहरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सामाजिक समता, शिक्षण आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांच्या विचारांना उजाळा देत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
जयंतीनिमित्त महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करत समाजात शिक्षणाचा प्रसार, स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा प्रसार करण्याची गरज अधोरेखित केली.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सुमारे ५ हजार मिसळ-पावचे वाटप करण्यात आले. सासवड परिसरातील ग्रामस्थांना प्रेमपूर्वक मिसळ-पाव देण्यात आला. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे आयोजन मा. ओबीसी जिल्हाध्यक्ष संजयजी टिळेकर, उद्योगपती विनोद ओव्हाळ, अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्यचे युवक अध्यक्ष दत्तात्रय सूर्यवंशी, राजेंद्र इनामके, संदीप म्हेत्रे (आरटीओ अधिकारी), सागर जगताप (संस्थापक अध्यक्ष), आप्पासाहेब भांडवलकर, प्रदेशाध्यक्ष राहुल भोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी आर्यन ओव्हाळ, माजी नगरसेवक रोहित इनामके, नगरसेवक चंद्रकांत गिरमे, पिंटू हिवरकर, जगदीश भोंडे तसेच आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भव्य कार्यक्रमामुळे सासवड परिसरात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभावी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *