सफाई कर्मचाऱ्याच्या मानधनासाठी युवकांचा मदतीचा हात : सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम

सफाई कर्मचाऱ्याच्या मानधनासाठी युवकांचा मदतीचा हात : सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम

शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे घडलेली एक सामाजिक जाणीवेची घटना समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे. गावातील ग्रामसफाई व शालेय स्वच्छता कर्मचारी किरण चिखले हा अल्प मानधनावर काम करत असून, जानेवारीपासून तो सातत्याने गाव व शाळा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपले कर्तव्य पार पाडत आहे. शाळेकडून त्याला मानधन दिले जात होते, मात्र कामाच्या तुलनेत ते अपुरे असल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक राहुल चातुर यांनी ग्रामस्थांसमोर किरण चिखले यांची व्यथा मांडली. गाव निरोगी आणि स्वच्छ राहण्यासाठी स्वच्छतादूताचे योगदान मोलाचे आहे, त्याला योग्य मानधन मिळणे आवश्यक आहे, अशी जाणीव ग्रामस्थ व युवकांना झाली.

यानंतर गावातील युवकांनी एकत्रित येऊन किरण चिखले यांना एक वर्षाचे मानधन देण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाच्या औचित्यावर शाळेतच युवकांनी मानधनाचा निधी सुपूर्त केला. या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमामुळे दिव्यांग असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले.

या उपक्रमासाठी शरद खळदकर, श्रीकांत सोनवणे, अतुल चिखले, सुनील सोनवणे, अभिषेक शेळके, मयूर बडदे, अमोल चिखले, मंगेश बडदे, शेखर पाटेकर, शशिकांत चिखले, आर्यन पाटेकर, आदित्य चिखले, माणिक म्हाळसकर, शंकर सोनवणे, नितीन बडदे, सर्जेराव चिखले या युवकांनी आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.

युवकांच्या या उपक्रमाचे मुख्याध्यापक राहुल चातुर व सहशिक्षक कांताराम शिंदे यांनी कौतुक करत सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

👉 हा उपक्रम केवळ मदत नाही, तर गावातील युवकांची सामाजिक जबाबदारी, कृतज्ञता आणि एकोपा यांचे जिवंत उदाहरण ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *