केडगाव येथे चार जैन साध्वींचा चातुर्मास प्रारंभ : धार्मिक वातावरणाने परिसर प्रसन्न

केडगाव येथे चार जैन साध्वींचा चातुर्मास प्रारंभ : धार्मिक वातावरणाने परिसर प्रसन्न

प्रतिनिधी : विकास साळुंके, आरजे न्यूज २७, दौंड तालुका

दौंड-केडगाव येथील श्री वर्धमान जैन स्थानक, केडगाव स्टेशन येथे चार महिन्यांच्या चातुर्मास निमित्ताने जैन समाजाच्या आध्यात्मिक साध्वींचे आगमन झाले असून परिसर धार्मिकतेने न्हाऊन निघाला आहे.

दिनांक ९ जुलै रोजी परमपूज्य साध्वी उप प्रवर्तिनी साध्वीरत्ना सन्मतिजी म. सा., परमपूज्य सुचेताजी म. सा., परमपूज्य सुप्रभाजी म. सा. आणि परमपूज्य सुबोधीजी म. सा. या चारही साध्वींचे मंगल आगमन झाले. त्यांच्या उपस्थितीत येथील चातुर्मासाला सुरुवात झाली आहे.l

या काळात दररोज सकाळी ८:३० ते ९:३० वाजेपर्यंत प्रवचन, धार्मिक कार्यक्रम व उपासना पार पडत असून श्रद्धावंतांच्या उपस्थितीमुळे परिसर धर्ममय आणि शांततेच्या वातावरणाने भरून गेला आहे.

चातुर्मासाच्या यशस्वीतेसाठी केडगाव जैन श्रावक संघाचे अध्यक्ष मनोज पोखरणा, उपाध्यक्ष नितीन छाजेड, बाळूभाऊ पितळे, संदीप कोठारी यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य समाजातील बंधू-भगिनींना सक्रिय सहभागाचे आवाहन करत आहेत.

या धार्मिक पर्वासाठी केडगावातील जैन श्रावक युवा वर्ग आणि महिला भगिनी अपार मेहनत घेत असून बाहेरगावाहून येणाऱ्या भक्तांसाठी गौतम प्रसादीची व्यवस्था रवींद्र रायसोनी कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.

चार महिन्यांच्या या चातुर्मासामुळे केडगाव परिसर धार्मिकतेचा केंद्रबिंदू बनला असून शांती, सद्भावना आणि अध्यात्मिकतेचा संदेश समाजात पसरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *