Snapchat वरून अश्लील फोटो पाठवून विद्यार्थिनीला धमकी; शिरूर पोलिसांत अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा

शिरूर : Snapchat या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अश्लील स्वरूपाचा फोटो पाठवून एका १८ वर्षीय विद्यार्थिनीचा सायबर छळ केल्याची घटना शिरूर शहर परिसरात समोर आली आहे. संबंधित अनोळखी व्यक्तीने विद्यार्थिनीकडे खासगी स्वरूपाचे फोटो व व्हिडिओ मागत ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rjnews 27 मराठी – 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर शहर परिसरातील १८ वर्षे ८ महिने वयाची विद्यार्थिनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास शिरूर शहर हद्दीतील संगम हॉटेल परिसरात घरी असताना, ‘vishalkhatpe26’ या Snapchat अकाउंटवरून तिच्या Snapchat अकाउंटवर अश्लील स्वरूपाचा फोटो पाठविण्यात आला.

 

यानंतर संबंधित अनोळखी व्यक्तीने विद्यार्थिनीकडे तिचे फोटो आपल्याकडे असल्याचे सांगितले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून खासगी स्वरूपाचे फोटो व व्हिडिओ मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच तिला भेटण्यासाठी येण्याची मागणी करण्यात आली. भेटण्यास न आल्यास तिच्याकडून पाठविलेले व्हिडिओ वेबसाईटवर अपलोड करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

या घटनेनंतर विद्यार्थिनीने शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानुसार ‘vishalkhatpe26’ हे Snapchat अकाउंट चालविणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक ८७१/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार आगलावे करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार खबाले यांनी केली आहे. सायबर माध्यमातून होणाऱ्या अशा प्रकारच्या छळाच्या घटनांबाबत नागरिकांनी सतर्क राहून संबंधित संदेश, अकाउंटची माहिती व इतर डिजिटल पुरावे जतन करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *