३८ वर्षांच्या शैक्षणिक सेवेनंतर सुनिता नाईक-वाव्हळ यांचा काव्यसंग्रह ‘काव्यकुसुम’ प्रकाशित.
Rjnews27 मराठी -रमेश बनसोडे
डॉ. संदीप सांगळे यांच्या हस्ते प्रकाशन; सेवानिवृत्ती समारंभात मान्यवरांची उपस्थिती
पुणे प्रतिनिधी : कवयित्री तथा कुरुळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता मधुकर नाईक-वाव्हळ यांच्या ‘काव्यकुसुम’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनिमित्त आयोजित सेवानिवृत्ती समारंभात हा प्रकाशन सोहळा पार पडला.
यावेळी लेखक सचिन बेंडभर आणि कवी विजय वडवेराव यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ सेवा बजावत असताना साहित्य क्षेत्रातही योगदान देणाऱ्या सुनिता नाईक-वाव्हळ यांच्या काव्यप्रवासाचा गौरव यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमास खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शांतारामदादा सोनवणे, पंचायत समिती खेडचे गटनेते शंकरशेठ कावडे, माजी उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ चव्हाण, भैरवनाथ विद्यालयाचे संस्थापक एम. के. सोनवणे, सचिव देवरामशेठ सोनवणे, कार्याध्यक्ष गुलाबराव सोनवणे, कुरुळीच्या सरपंच शिवगंगा सोनवणे, माजी सरपंच शरदकाका मुर्हे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय अनिता बधाले, विस्तार अधिकारी टिळेकर, सोनाली झिंजुडे, केंद्रप्रमुख सुनील रायकर, प्रतिभा धायबर, भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक थोरात सर, आजी-माजी शिक्षकवृंद, मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी, छत्रपती पतसंस्थेचे पदाधिकारी, माजी सरपंच व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. संदीप सांगळे म्हणाले, “कवयित्री सुनिता मधुकर नाईक-वाव्हळ या एक संवेदनशील कवयित्री आहेत. त्यांचा ‘काव्यकुसुम’ हा काव्यसंग्रह समाजातील वास्तव जीवनाचा आरसा आहे. व्यवस्थेला कुठेही धक्का न लागता किंवा कोणतेही बंड न करता त्यांनी सविनय मार्गाने समाज परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला आहे.”
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







