कोयता फिरवून बुलेटच्या फटाक्यांचा आवाज काढत दहशत माजविणाऱ्यांवर फुरसुंगी पोलिसांची कारवाई; दोन आरोपींसह विधिसंघर्षित बालक ताब्यात

कोयता फिरवून बुलेटच्या फटाक्यांचा आवाज काढत दहशत माजविणाऱ्यांवर फुरसुंगी पोलिसांची कारवाई; दोन आरोपींसह विधिसंघर्षित बालक ताब्यात

Rjnews 27 मराठी – विकास साळुंके 

पुणे : शहरात कोयता फिरवून तसेच बुलेटच्या फटाक्यांचा आवाज काढून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दोन आरोपींसह एका विधिसंघर्षित बालकाला फुरसुंगी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एक कोयता व बुलेट मोटारसायकल असा अंदाजे दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस पथक गस्त घालत होते. यावेळी पोलीस अंमलदार मोरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गंगानगर परिसरात काही इसम बुलेटचे फटाके फोडून तसेच कोयता दाखवून दहशत निर्माण करत आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एच.पी. पेट्रोलपंप, फुरसुंगी, पुणे येथे सापळा रचून नागेश अशोक जाधव (वय १९, रा. सिद्धिविनायक कॉलनी, गंगानगर, पुणे) आणि हनुमान शिवाजी शिरसोडे (वय २१, रा. सिद्धिविनायक कॉलनी, गंगानगर, पुणे) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत एका विधिसंघर्षित बालकासही ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक कोयता व बुलेट मोटारसायकल असा अंदाजे दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहरात दहशत निर्माण करणाऱ्या या प्रकाराची गंभीर दखल घेत फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गुन्हे गोहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-२ राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष शेटे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष कदम, पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव तसेच पोलीस अंमलदार सरस्ते, वणवे, तानाजी देशमुख, कांबळे, बांदल आणि महिला पोलीस अंमलदार लोखंडे यांच्या पथकाने केली.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *